दासांचाही दास श्रीहरी
दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन घाशितो नाथाघरी चंदन कावडीवर कावडी ओतिल्या आणुनिया तांतडी विसरला भक्तसखा मीपण नाथासह कीर्तनी आपुल्या रंगे गुणगायनी साथ दे चिपळ्यांची डोलून भक्ताघरी राबतो सहज तो भक्तांना लाभतो प्रभूला भक्तीचे बंधन