दाटून कंठ येतो ओठांत येई गाणे जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने ! हातात बाळपोथी ओठांत बाळभाषा रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा वळवून अक्षरांना केले तुला शहाणे जातो सुखावुनी मी त्या गोड आठवाने ! बोलांत बोबडीच्या संगीत जागविले लय-ताल-सूर लेणे सहजीच लेववीले एकेक सूर यावा न्हाऊन अमृताने अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे ! घेऊ कसा निरोप? तुटतात आत धागे हा देह दूर जाता मन राहणार मागे ! धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे परक्यापरी अता मी येथे फिरून येणे