दयाघना का तुटले
दयाघना का तुटले चिमणे घरटे? उरलो बंदी असा मी अरे जन्म बंदिवास सजा इथे प्रत्येकास चुके ना कुणास आता बंदी तुझा मी दयाघना दहा दिशांची कोठडी मोह-माया झाली बेडी प्राण माझे ओढी झालो बंदी असा मी दयाघना बालपण उतू गेले अन् तारुण्य नासले वार्धक्य साचले उरलो बंदी पुन्हा मी दयाघना