PrintSource

देह देवाचे मंदिर

Deh Devache Mandir

प्र. के. अत्रे

देह देवाचे मंदिर
आत आत्मा परमेश्वर

जशी उसात हो साखर
तसा देहात हो ईश्वर !

जसे दुधामध्ये लोणी
तसा देही चक्रपाणि

देव देहात देहात
का हो जाता देवळात?

तुका सांगे मूढ जना
देही देव का पहाना