देवा मला का दिली बायको
देवा मला का दिली बायको अशी? शिकवून थकलो मी दर दिवशी ! श्रीमंताची लेक आहे आळशी अती एवढीशी खोली तरी घाण ही किती पलंगाच्या खाली सदा खेळती घुशी ! उपवास धरी, करी एकादशी दिसभर पिते लस्सीवरही लस्सी आणि फराळाने भरी दोन्हीही कुशी ! बॉबीकटवाली माझी राणी असे हिच्या वागण्याने केले वेडेपिसे धाकानं मी ओठावरची काढितो मिशी ! सत्यनारायणा तुझी पूजा घातली हिच्या पुढे पोथी-पुरणेही वाचली तरी गुलहौशी आहे जशीच्या तशी !