देवा तुझी आठवण होते
देवा तुझी आठवण होते सुख मावळते आणि शिरावर संकट कोसळते सुंदर सुमने मुकती प्राणा उरात घुसती काटे आग धगधगे वरती-खाली वाळवंट रखरखते दुबळ्या जीवा कळे न जेव्हा काय खरे अन् खोटे पिचते अंतर अन् रक्ताचे पाणी-पाणी होते केवळ ढळढळ अश्रू ढाळणे हेच नशिबी येते