देवाचिये द्वारीं उभा
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥१॥ हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा । पुण्याची गणना कोण करीं ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेवो ह्मणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥