देवाघरच्या फुला सोनुल्या, देवाघरच्या फुला ! अपुले मंगल सांगत नाते बाळ घरी हे रांगत येते आनंदाने हसत खेळतो झुलवित वारा झुला ! दुडु दुडु धावत हसे चिमुकला असा जिवाचा माझा छकुला अवतीभवती सुगंध सुंदर हाक घालितो तुला ! मायपित्याने तुला सोडिले हृदयाने मम जवळ घेतले भाग्यवान मी अमोल ठेवा असा लाभला मला !