देवमाणूस देवळात आला
धरमशाळंचं देऊळ झालं, चमत्कार झाला देवमाणूस देवळात आला ! या उजाड माळावरती माझ्या देवानं केली प्रीती फुलबागेचं रूप पाहुनी हरपून जीव गेला देवमाणूस देवळात आला ! गेला अंधार, सरली रात नारायणाचा फिरला हात दळिंदराच्या अंगावरती किरणांचा शेला देवमाणूस देवळात आला ! वस्ती-वाडी ही खुळी झोपडी मायलेकरं ही येडीबागडी भगवंतानं भोळेपणाचा उद्धार लई केला देवमाणूस देवळात आला !