धन्य धन्य हो प्रदक्षिणा
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरूरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्वही तीर्थे घडली अम्हां आदिकरूनि काशी गुरुभजनाचा महिमा नकळे आगमानिगमांसी अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला