धन्य ती पंढरी धन्य भीमातीर । आणिंयेलें सार पुंडलिकें ॥१॥ धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥२॥ धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥३॥ धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदे भुवन गर्जतसे ॥४॥ धन्य पशु-पक्षी-कीटक-पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥५॥ तुका ह्मणे धन्य संसारातें आलीं । हरिरंगी रंगली सर्वभावें ॥६॥