PrintSource

धांव घालीं विठू आतां

Dhav Ghali Vithu Aata

संत चोखामेळा

धांव घालीं विठू आतां चालूं नको मंद ।
बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥

विठोबाचा हार तुझ्या कंठीं कैसा आला ।
शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला ॥२॥

जोडुनियां कर चोखा विनवितो देवा ।
बोलिला उत्तरीं परि राग नसावा ॥३॥