धिनक धिताम् ढोलक बोले मनातले बोल ग विझता विझता रातीला पडे पैंजणांची भूल ग पुनव रातीला जागर चाले आभाळावरती चांदण झुले झुलत झुलत गळून जाती मनातले सल ग रात साजरी रात जागवी आठवणींची रेघ लाघवी जागत जागत ओटीत यावे प्राजक्ताचे फूल ग जोगीण धावे जाराच्या मागे गतकाळाचे पाशवी धागे धावत धावत विणून जाई प्रारब्धाची वीण ग