PrintSource

धुके दाटलेले उदास उदास

Dhuke Datalele Udas Udas

मंगेश पाडगांवकर

धुके दाटलेले उदास उदास
मला वेढिती हे तुझे सर्व भास

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन्‌ फिरे आर्त वारा
कुणीही न येथे दिसे आसपास

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा?
कुणा शोधिती या उदासीन लाटा?
दिशांतून दाटे तुझा एक ध्यास

क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास