धुंद एकान्त हा
धुंद एकान्त हा, प्रीत आकारली सहज मी छेडिता तार झंकारली जाण नाही मला, प्रीत आकारली सहज तू छेडिता तार झंकारली गंधवेडी कुणी लाजरी बावरी चांदणे शिंपिते चैत्रवेलीतली यौवनाने तिला आज शृंगारली गोड संवेदना अंतरी या उठे फूल होता कळी, पाकळी ही मिटे लोचनी चिंतनी मूर्त साकारली रोमरोमांतुनी गीत मी गाइले दाट होता धुके स्वप्न मी पाहिले पाहतापाहता रात्र अंधारली आज बाहूत या लाज आधारली सहज तू छेडिता तार झंकारली