ध्यास हा जिवाला
ध्यास हा जिवाला पंढरीसि जाऊ वैकुंठीचा राणा डोळेभरी पाहू ! पुंडलिकाभेटी परब्रह्म आले भक्तांचिया काजा विटेवरी ठेले मधुर नाम त्या माधवाचे गाऊ ! साजिरे ते रूप पुतळा प्रेमाचा कांसे पीतांबर टिळा कस्तुरीचा सांवळी विठाई अंतरात ध्याऊ ! तुक्याचे अभंग गाइ चंद्रभागा साथ देइ वारा भजनाच्या रंगा रंग तो लुटाया वारकरी होऊ !