दिन तैसी रजनी झाली गे
दिन तैसी रजनी झाली गे माये ॥१॥ पडिलें दूरदेसीं, मज आठवे मानसीं । नको नको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ॥२॥ अवस्था लावोनी गेला, अजून कां न ये ॥३॥ गरुडवाहना गुणगंभीरा, येईं गा दातारा । बाप रखुमादेवीवरा, श्रीविठ्ठला ॥४॥