दिसली पुनरपी गुप्त जाहली
दिसली पुनरपी गुप्त जाहली प्रिया सुभद्रा घोर वनीं । येथें सुंदरी कैशी आली हेंचि कळेना मज अजुनी ॥ माझ्या वेषा खरें मानुनी हलधरही लागत भजनीं । त्रिकालज्ञ परि मोह पावले कैसे नकळे गर्गमुनी । कपटी कृष्णाचीही बुद्धी गेली कैशी ती भुलुनी । या सर्वांचा विचार करितां जातों मूढचि होवोनी ॥