दिसलीस तू फुलले ॠतू
दिसलीस तू, फुलले ॠतू उजळीत आशा, हसलीस तू उरले न आसू, विरल्या व्यथाही सुख होऊनिया आलीस तू जाळीत होते मज चांदणे जे ते अमृताचे केलेस तू मौनांतुनी ये गाणे दिवाणे त्याचा अनामी स्वरभास तू जन्मांत लाभे क्षण एकदा हा ते भाग्य माझे झालीस तू