दिसते मजला सुखचित्र नवे
दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते ! प्रीत तुझीमाझी फुलावी या फुलत्या वेलीपरी भाव मुके ओठांत यावे गंध जसा सुमनांतरी शब्दाविना मनभावना अवघ्याच मी तुज सांगते ! हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी मी तुझिया मागून यावे आस ही माझ्या उरी तुजसंगती क्षण रंगती निमिषात मी युग पाहते ! स्वर्ग मिळे धरणीस जेथे रंग नवे गगनांगणी सप्तसूरां लेवून यावी रागिणी अनुरागिणी तुझियासवे सुखवैभवे सौभाग्य हे नित् मागते !