दिवसभर पावसात असून सांग ना आई, झाडाला खोकला कसा होत नाही? दिवसभर पावसात खेळून सांग ना आई, वारा कसा जराही दमत नाही? रात्रभर पाढे म्हणून सांग ना आई, बेडकाचा आवाज कसा बसत नाही? रात्रभर जागून सुद्धा सांग ना आई, चांदोबा झोपी कसा जात नाही? दिवसभर काम करून सांग ना आई, तुला मुळी थकवा कसा येत नाही?