दिवस असे की कोणी माझा नाही अन् मी कोणाचा नाही आकाशाच्या छत्रीखाली भिजतो आयुष्यावर हसणे थुंकून देतो या हसण्याचे कारण उमगत नाही; या हसणे म्हणवत नाही ! प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे या घोड्याला लगाम शोधत आहे; परि मजला गवसत नाही मी तुसडा की मी भगवा बैरागी? मद्यपि वा मी गांजेवाला जोगी? अस्तित्वाला हजार नावे देतो; परि नाव ठेववत नाही 'मम' म्हणताना आता हसतो थोडे मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे या जगण्याला स्वप्नांचाही आता; मेघ पालवत नाही