ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । ह्मणती ज्ञानदेव तुह्मां ऐसें ॥१॥ मज पामरासीं काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥ ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे । इतर तुळणें काय पुढे ॥३॥ तुका ह्मणे नेणे युक्तीचिया खोलीं । ह्मणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥