दो दिसांच्या संगतीची
का असा गेलास तू? ना बोलता ना सांगता दो दिसांच्या संगतीची हीच का रे सांगता? भावमाला लोपल्या ओठीच्या ओठीच का? फुलविली तू लाज गाली सुकविण्यासाठीच का? पुसुन गेल्या रंगरेखा चित्र अपुरे रंगता दूर व्हाया जवळ आली काय वेडी पाखरे? ये पुन्हा ये राजहंसा, पंखी जीवा झाक रे हाक मारू मी कशी रे गुज फुटते बोलता ठाउका ना ठाव कोठे, मार्ग नाही माहिती शोध घ्याया अंतरीचे नेत्र माझे धावती ये उदारा राजसा रे, आसरा दे मागता