सावध व्हा भाइ सावध व्हा दो दिवसांची तनु ही साची सुरतरसाची करुनि मजा गमजा करितां मनिं उमजाना हें सुख न पुढें पडेल वजा पाट बसाया ताट रुप्याचें दाट त्यामध्यें दुधरवा धना वयाला बसेल घसरा मग विसरा हो गोड खवा सगेसायरें वंचक चोरें जंवर मिळवितां तंवर थवा शितें तंवर तीं भुतें भोंवतीं कोण कुणाचा सखा जीवा जोंवरि पैसा तोंवरि बैसा मंचकिं म्हणतिल घ्याल हवा बेटाबेटी हातिं नरोटी देतिल हा खुब समज ठिवा हरिसि भजा, हात जोडितों हरिसि भजा