डोळे माझे त्यात तुझे
डोळे माझे त्यात तुझे रूप कसे? ओठ माझे त्यात तुझे गीत कसे? चित्त माझे त्यात तुझी प्रीत कशी? वीज इथे आग तिथे सांग कशी? नीज माझी त्यात तुझे स्वप्न कसे? चाल माझी त्यात तुझा डौल कसा? स्पर्श तिथे कंप इथे सांग कसा? गाल माझे त्यात तुझे रंग कसे? चंद्र माझा त्यात तुझा डाग कसा? देह इथे प्राण तिथे सांग कसा? चाल माझी त्यात तुझे सूर कसे? श्वास माझा त्यात तुझी ओढ कशी? चोर तिथे चोरी इथे सांग कशी? वेध माझा त्यात तुझे तीर कसे?