डोळे मोडित गौळण राधा
डोळे मोडित गौळण राधा हिला जडली मोहन बाधा भाळल्या कितिक गौळणी राधिका कोर चांदणी बाळ मुकुंद राजस गुणी कसे बाई लाविले नादा किती बाई काळाकाळा दिसे अचुकच कान्हा डोळा वरपांगी भाव ग भोळा नाही नंदलाल हा साधा मुरलीची करी ग पिचकारी रंगवी हरी ब्रिज नारी लाजता हसे गिरिधारी रंगात रंगली राधा