कधी बहर कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे बहर धुंद वेलीवर यावा हळूच लाजरा पक्षी गावा आणि अचानक गळुन पडावी विखरुन सगळी पाने भान विसरुनी मिठी जुळावी पहाट कधि झाली न कळावी भिन्न दिशांना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे हळूच फुलाच्या बिलगुन गाली नाजुक गाणी कुणी गायिली आता उरली आर्त विराणी सूरच केविलवाणे जुळली हृदये, सूरहि जुळले तुझे नि माझे गीत तरळले व्याकुळ डोळे कातरवेळ स्मरून आता जाणे