PrintSource

डोळ्यांत सांजवेळी आणू

Dolyat Sanjaveli Anu

मंगेश पाडगांवकर

डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामात गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

कळणार हाय नाही दुनिया तुला-मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी