PrintSource

डोळ्यांत वाच माझ्या

Dolyat Vach Majhya

ग. दि. माडगूळकर

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे
सादाविना कळावे संगीत लोचनांचे

मी वाचले मनी ते, फुलली मनात आशा
सांगावया तुला ते नाही जगात भाषा
हितगूज प्रेमिकांचे हे बोल त्या मुक्यांचे

हास्याविना फुटेना ओठांत शब्द काही
कळले सखे तुला ते, कळले तसे मलाही
दोघांस गुंतविती म‍ऊ बंध रेशमाचे

पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या
या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या
गंधात धुंद वारा वार्‍यात गंध नाचे