दोन धृवावर दोघे आपण तू तिकडे अन् मी इकडे वार्यावरती जशी चुकावी रानपाखरे दोहीकडे दिवस मनाला वैरि भासतो तारा मोजित रात गुजरतो युगसम वाटे घडी घडी ही कालगती का बंद पडे? नि:श्वसिते तव सांगायाला पश्चिमवारा बिलगे मजला शीतल कोमल तुझ्या करांचा सर्वांगी जणुं स्पर्श घडे स्मृतिपंखांनी भिरभिर फिरते एक पाखरूं तुझ्याच भंवते मुक्या मनाचे दु:ख सागरा सांग गर्जूनी तूं तिकडे तोच असे मी घरही तेही तोच सखी संसार असेही तुझ्यावाचुनी शून्य पसारा, प्राण तिथे अन् देह इथे