दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो ! तारकांस हालचाल मी तुझी विचारतो ! वाटते कधी चुकून भेटशील तू अजून थांबतो पुन्हा मधून अन् उगीच सावल्यांत सैरभैर पाहतो ! चाललो असेच गात ऐकते उदास रात चंद्रमा झुरे नभात अन् इथे फुलाफुलांत मी तुलाच शोधतो ! वेड लागले जिवास हे तुझे दिशांत भास हा तुझा मनी सुवास आपल्याच आसवांत मी वसंत ढाळतो !