एक वेस ओलांडली गाव एक दूर राहिले एकट्याच वाटेस या दिशांनीच सांभाळले इथेच मधेच क्षणैक उगाच का मी थांबलो सावलीत माझिया एकटा विसावलो पुन्हा उन्हात चाललो एक वेस ओलांडली, गाव एक दूर चालले उसासे फुलांचे खुलासे सणांचे का मी ऐकतो मातीच्या उरातल्या स्पंदनात गुंगतो पुन्हा मनात भंगतो पावलास स्पर्श सांगतो गाव दूरदूर थांबले एक वेस ओलांडली संपल्या जुन्या खुणा जरी नवा ठसा दिसे प्रवासी पुन्हा हाच खेळ संचिती असे एक वेस ओलांडता गाव नवे दिसू लागले एकट्याच वाटेस या दिशांनीच सांभाळले