एकलेपणाची आग लागली हृदया घनदाट दाटली विषण्णतेची छाया तडफडे जिवाचें पांखरुं केविलवाणें होत ना सहन त्या एकलकोंडें जगणें जोडीस शोधीतें उदात्त अपुल्यावाणी प्रतिशब्द जिवाचा न दिला अजुनी कोणी गुम्फीत कल्पनाजाला । गुंगणे गुरफटुन त्यांत जिवाला । टाकणें रंगीत स्वप्नसृष्टीला उठविणें ही स्वप्नसृष्टि पटतसे जिवाला वेड्या ही सुवर्णलंका दीपवित अवघी हृदया परि इंद्रजाल हें जात जधीं विरुनियां एकलेपणाची आग लागते हृदया !