PrintSource

एकटीच भटकत नदीकाठी

Ekatich Bhatakat Nadikathi

स. अ. शुक्ल

एकटीच भटकत नदीकाठी
ऐन दुपारी तोर्‍यानं
नटुनथटुन जशी चटकचांदणी
कुठं चाललीस नखर्‍यानं

अंगांत धमक डोळ्यांत चमक
कमरेत लचक आणि नजरेत वचक
काळजास का देसी चरका
मारुनी मुरका कुर्र्यानं
जशी कुणा घायाळ कराया
नेत्रशरांच्या मार्‍यानं

गाल रंगदार चाल ढंगदार
धुंद नागिणी जशी चमकशी
नवरसरंग-फवार्‍यानं
चाल हळू जरा- सावर, आवर
पदर उडाला वार्‍यानं