गा गीत तू सतारी
गा गीत तू सतारी, गा गीत आसवांचे या जीवनात वेडे नाही कुणी कुणाचे किती रंग-गंध हळवे फुलती भल्या पहाटे होता दुपार विरती, निमिषात सांज दाटे काळोख पीत येती स्वर मंद काजव्याचे पंखात ऊब घेते पिल्लू मुक्या खगाचे चोचीत गोड दाणा घेण्यास जीव नाचे पिल्लास पंख फुटता घर शून्य पाखराचे टाक्यापरी सुईच्या स्वर आर्त छेदतारे ते सांधती मनाचे आभाळ फाटणारे गाण्यापरी जिण्याला आकार भावनांचे