गाव झाला जागा आता उठा पांडुरंगा ! उजळली उगवती जथे पाखरांचे गाती सकाळच्या कळशीत आली चंद्रभागा घरोघरी सवाशिणी सडे शिंपिती अंगणी साद थकलेले गाती तुक्याच्या अभंगा रेखितात पोरीबाळी चार रांगोळीच्या ओळी विठो-रुक्मिणीचे रूप दावितात रेघा मराठीच्या मुलुखात जिथेतिथे पंढरीनाथ माय धरित्रीही ल्याली सावळ्याच रंगा