लाखांमधुनी सख्या तुम्हाला अचूक मी हेरलं तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं ! ही ऐन भराची उमर लई मोलाची ही चिक्कणमाती सोन्याच्या तोलाची अंगामधुनी पिसाट वारं ज्वानीचं भरलं सख्या तुम्ही बांधा एक डोरलं ! हे घुंगरू बांधण्या कितीदा खाली वाकू किती किती लाज मी पदराखाली झाकू चाळांमधुनी वीज पाखरू मनात थरथरलं सख्या तुम्ही बांधा एक डोरलं ! दोघांत रंगला नजरबंदीचा खेळ पर हार-जीतीचा बसला नाही मेळ बक्कळ झाल्या भेटी आता एक काम उरलं सख्या तुम्ही बांधा एक डोरलं !