गाणे स्वातंत्र्याचे
गाणे स्वातंत्र्याचे, गाणे मांगल्याचे हृदयामधल्या चैतन्यातुन गाणे भारतभूचे गाणे नसते म्हणावयाचे केवळ शब्द-सुरांनी; गाणे असते जगावयाचे अपुल्या समर्पणांनी ! समर्पणानी लढलेल्या त्या, गाणे नरवीरांचे ! अनेक भाषा विविध प्रांत हे, अखंड एका ठायी; तळहातावर प्राण घेउनी भारतभूच्या पायी ! सुख-शांती अन् समृद्धीच्या मंगल परंपरेचे ! सात रंग हे इंद्रधनूतून झुलती आनंदाने एकच गाणे फुलते ओठी, सजते सात सुरांनी कोटि कोटि हृदयांतुन गाऊ गाणे अखंडतेचे