गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे ! आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ! पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो; वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे ! सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो; सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे ! लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !