गौळणींनो जाउ नका बाजारी
दह्यादुधाची करतो चोरी, नंदाचा हरी गौळणींनो, जाऊ नका बाजारी नंदाघरचा कृष्ण सावळा वाट अडवून उभा राहिला गौळणींना ग छळतो भारी, खट्याळ गिरिधारी रोज त्याला हवेच ग लोणी करी मागणी हात पकडुनी नकार देता शारंगपाणी करतो शिरजोरी पदराशी लगटही करतो दह्यादुधाचे घडे ग मागतो खडे मारतो पळुनी जातो, कृष्ण करी मस्करी