गीत आसावले तुझ्यासाठी ! सूर खोळंबले तुझ्यासाठी ! तू मला अर्थ दे अजून तरी शब्द ओलांडले तुझ्यासाठी ! ही तुझी रात.. हे तुझे तारे.. श्वास घेती फुले तुझ्यासाठी ! दूर.. येथून दूर.. दूर.. तिथे- चांदणे थांबले तुझ्यासाठी ! का तुला सोडवे न गाव तुझे? मी मला सोडले तुझ्यासाठी !