गेलें द्यायचें राहून तुझें नक्षत्रांचें देणें; माझ्यापास आतां कळ्या आणि थोडीं ओलीं पानें. आलों होतों हांसत मी कांहीं श्वासांसाठीं फक्त; दिवसांचें ओझें आतां रात्र रात्र सोशी रक्त; आतां मनाचा दगड घेतों कण्हत उशाला; होतें कळ्यांचें निर्माल्य आणि पानांचा पाचोळा.