PrintSource

गेलीस सोडुनी का दाक्षायणी

Gelis Soduni Ka

ग. दि. माडगूळकर

गेलीस सोडुनी का दाक्षायणी शिवांगी?
अमरत्व शाप आहे, मजसी तुझ्या वियोगी

देवी तुझ्याविना मी देहा धरू कशाला?
नारीविना जगी ना सामर्थ्य पौरुषाला
अर्धांग भस्म झाले, अर्धाच मी, अभागी
अमरत्व शाप आहे, मजसी तुझ्या वियोगी

विसरू कसा सखे मी आनंद भोगलेला?
घर शैलकंदरीचे, गिरीशीर्ष चंद्रशाला
संसार सौख्यदायी, सहवास सप्तरंगी
अमरत्व शाप आहे, मजसी तुझ्या वियोगी