PrintSource

घडी घडी अरे मनमोहना

Ghadi Ghadi Are Man

शाहीर होनाजी-बाळा

घडी घडी अरे मनमोहना हांसुन गुणिजनां देखतां नको रे बोलूं मशीं
भरम धरिल जन तुझा नि माझा पहा पुरती चौकशी

छबीदार सुरत साजिरी दिसे गोजिरी बरी आवडलीस माझ्या मना
कुठें दिसेना दुजा पुरुष मज तुजसम रे देखणा

तुझीं प्रीत लाधली कुठुन रोज नीट उठुन तुटुन जीव पडतो झालें पिसीं
सजणा नको रे बोलूं मशीं
सजणी नको ग बोलूं मशीं

घडी घडी अरे मनमोहना हांसुन गुणिजनां देखतां नको रे बोलूं मशीं

दिसतेस चटकचांदणी अगे साजणी मनीं तू ठसलीस आमच्या गडे
छंद लागला तुझा आम्हांला रात्रंदिन फांकडे
निजध्यास सदा अंतरी फिदा तुजवरी घरीं मी सिद्ध करुनिया विडे
घरीं मी सिद्ध करुनिया विडे
एकान्‍ति मुखी घालतां चकाकतील-
माझ्या हातांतील चुडे
इश्काची चटक लागली जीवा चांगली रंगली वृत्ति तुजपाशीं
सजणा नको रे बोलूं मशीं
सजणि नको ग बोलूं मशीं

घडी घडी अरे मनमोहना हांसुन गुणिजनां देखतां नको रे बोलूं मशीं