घडणारे सारे घडून गेले
घडणारे सारे घडून गेले पुरते मी अजून स्वप्नी खुळ्यापरी का रमते? हळुवारपणाने जपली होती प्रीत परि विपरीत तोही, विपरीत त्याची रीत भ्रमराच्या नादे, फूल बिचारे फसते ! त्या शपथा हळव्या, हळवे प्रेम उखाणे ते होते केवळ फसवे धूर्त बहाणे ना गुन्हा तरीही, शापित जीवन जगते ! आसमंत सारा भासे शून्य भयाण ना वृक्षावरती एकही हलते पान का जुन्या स्मृतींना आठवुनी मी रडते?