घन करुणेचा सूर
घन करुणेचा सूर, तयांतून भरु दे अवघा ऊर शांत शांत हलकेच होऊ दे, जिवातले काहूर अरूपाला मी साद घालता गूढ निलायम मौन बोलता नश्वर वितळून ईश्वर उजळो, साधनेस दे नूर पाषाणातून झरू दे जीवन असे वाहू दे स्वर संजीवन ऐल पैल हे मुळी नसावे, असा जागू दे पूर