घन तमीं शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना, बघ जरा तरी ! ये बाहेरी अंडें फोडुनि शुद्ध मोकळ्या वातावरणीं, कां गुदमरशी आंतच कुढुनी? रे ! मार भरारी जरा वरी. फूल गळे, फळ गोड जाहलें, बीज नुरे, डौलांत तरू डुले; तेल जळे, बघ ज्योत पाजळे; का मरणिं अमरता ही न खरी? मना, वृथा कां भीशी मरणा? दार सुखाचें तें हरि-करुणा ! आई पाही वाट रे मना, पसरोनी बाहु कवळण्या उरीं.