घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥ चांदु वो चांदणे । चांपे वो चंदने । देवकीनंदनेविण । नावडे वो ॥२॥ चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥ सुमनाची सेज । सितळ वो निकी । पोळे आगीसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥ तुह्मी गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावी उत्तरें । कोकिळें वर्जावें । तुह्मीं बाईयांनो ॥५॥ दर्पणीं पाहतां । रूप न दिसे वो आपुलें । बाप रखुमादेवीवरें । मज ऐसें केलें ॥६॥