घर असावे घरासारखे
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी अश्रूंतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी या घरट्यातुन पिल्लू उडावे दिव्य घेउनि शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती